क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्तमनगर पोलिसांनी केली ‘मोक्का’ नुसार कारवाई.

क्राईम पेट्रोल न्युज

पुणे प्रतिनिधी : सहा लाख रुपयांच्या बदल्यात १७ लाख रुपयांची मागणी करत, पैसे न दिल्यास ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देवुन जबदरस्तीने  महिला आणि त्यांच्या सहकारी महिलेचे अपहरण करून घरात डांबुन ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्यानंतर आता त्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.

 बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५ वर्षे, रा. उत्तमनगर पुणे), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९ वर्षे, रा. गणेशनगर, एरंडवणा, ओटा वसाहत, पुणे), प्रदिप प्रभाकर नलवडे (वय ३८वर्षे, रा. भुगाव, पुणे) आणि अक्षय मारुती फड (वय २४ वर्षे, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. यातील टोळीप्रमुख बाबुलाल मोहोळच्या पुर्व रेकॉर्डची पाहणी करता त्याच्या साथीदारासह त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने कोथरुड, अलंकार , उत्तमनगर या भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याच्या उददेशाने, गुन्हयातील साथीदार आरोपीना स्वतःबरोबर घेवून गुन्हेगारी टोळी स्थापन केली. त्यावर यापुर्वी पुणे शहरातील तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न , दरोडा , मारामारी , बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन , खंडणी गोळा करणे अशा प्रकारचे एकुण १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ च्या कलमानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता. त्याला पाटील यांनी मंजुरी दिली. सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, कोथरुड विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख, सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार , उमेश रोकडे , निगराणी पथकातील पोलीस अंमलदार समीर पवार , अनिरुद्ध गायकवाड , महिला पोलीस अंमलदार अश्विनी खाडे व तपास पथकातील पोलीस अमलदार तानाजी नांगरे , परमेश्वर पाडाळे, ज्ञानेश्वर तोडकर यांनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.