क्राईममहाराष्ट्र

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल चोरले.

भारती विदयापीठ पोलिसांची कारवाई.

पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे पेट्रोलींग करीत असताना त्यांना कात्रज तलाव येथे दोन जण चोरीचे मोबाईल फोन विक्री करता आले असल्याची माहिती मिळाली .पोलिसांनी लगेच कात्रज तलाव येथे जावुन शोध घेतला असता दोन जण बॅगेसोबत आढळले त्यांच्याकडे आधीक चौकशी केली असता मोबाईल फोन कात्रज,गोकुळनर, कोंढवा भागातुन चोरी केले असुन ते विक्री करता आलो असल्याचे सांगितले. त्यानुसार

१. अर्जुन महादेव शेलार, वय १८ वर्षे, ६ महीने, रा. भिवरी, ता.पुरंदर,२. प्रेम राजु शेलार, वय २० वर्षे, रा. भिवरी, ता. पुरंदर यांना गुन्हयामध्ये अटक करुन त्यांच्याकडुन एकुण २,०२,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

आरोपींनी गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.

 

ही कारवाई श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.