क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यासह शहरातील क्राईम न्यूज वाचा आता एका क्लिकवर.

" CRIME PETROL " न्यूज पोर्टल च्या माध्यमातून.

पुणे :- राज्यातील पोलीस दल,विविध शहरातील पोलीस दलाकडून तसेच विविध पथके यांच्याकडून अनेक प्रकारच्या कारवाया केल्या जातात. परंतू पोलिसांच्या या कारवाईची (चांगल्या कार्याची माहिती ) सामन्यांना कळावी, पोलीस खात्यातील विविध कारवाया व त्याचे वृत्त नागरिकां पर्यंत पोहचावे म्हणून आम्ही ” CRIME PETROL ” न्यूज पोर्टल च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत येत आहोत.

पोलीस खात्याविषयी थोडक्यात.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम महाराष्ट्रा पोलीस करत असतात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाचीओळख आहे. राज्यात १२ पोलीस आयुक्तालये व छत्तीस जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मुंबई येथे मुख्यालय आहे.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. तर पोलीस महासंचालक पद हे महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रमुख असतात.राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे.

पोलिस अधीक्षक तसेच त्यांच्या पेक्षा वरील अधिकारी हे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात. यांची निवड संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे करण्यात येते त्यांची नेमणूक राज्य सरकार करते.

राज्यातील प्रमुख शहरे आणि शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील आयुक्तालयांवर असते. गुन्ह्यांचा तपास आणि गुन्हेगारांना पकडण्यातही आयुक्तालयाची भूमिका असते.

विशेष पथके

राज्य गुप्तचर विभाग,गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे,दहशतवाद विरोधी पथक (एटीएस),महामार्ग वाहतूक पोलीस,राज्य राखीव पोलीस दल (SRPF),प्रशिक्षण संचालनालय,मोटार परिवहन विभाग,राज्य वायरलेस पोलीस,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी),नागरी हक्क संरक्षण अशी पथके राज्य पोलीस दलात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.